
परिचय
ग्रामपंचायत तांबरवाडीच्या प्रशासनाचा गाभा म्हणजे सचिव / ग्रामसेवक. ग्रामपंचायतीच्या सर्व शासकीय कामकाजाचे नियोजन, अंमलबजावणी आणि नियंत्रण ही जबाबदारी ग्रामसेवकावर असते. गावातील विविध शासकीय योजना राबविणे, ग्रामसभांचे आयोजन, आर्थिक व्यवहारांचे व्यवस्थापन आणि ग्रामपंचायतीचे नोंदवही ठेवणे ही महत्त्वाची कामे त्या दक्षतेने पार पाडतात.
सचिव / ग्रामसेवक यांची माहिती
| घटक | माहिती |
|---|---|
| नाव | श्रीमती. हाके. के. जी. |
| पद | ग्रामसेवक – ग्रामपंचायत अधिकारी |
| गाव | ग्रामपंचायत तांबरवाडी / राजेवाडी |
| संपर्क क्रमांक | 📞 9112915181 |
| ई-मेल | ✉️ kghake26@gmail.com |
| कारकिर्दीचा कालावधी | नियुक्ती दिनांक – 30/06/2018 कार्यरत – आजपर्यंत (2025) |
कार्यशैली
सचिव हाके. के. जी. यांनी आपल्या कारकिर्दीत प्रशासनातील पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि वेळेवर कार्यनिवृत्ती यासाठी विशेष ओळख निर्माण केली आहे. त्यांनी तांबरवाडी आणि राजेवाडी गावांमध्ये ग्रामविकास, स्वच्छता मोहीम, आणि डिजिटल ग्रामपंचायत उपक्रमांत मोलाचे योगदान दिले आहे.